Ticker

6/recent/ticker-posts

वेअरेबल ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी डिस्प्लें चष्मा म्हणजे काय आहे?

वेअरेबल ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी डिस्प्लें म्हणजे काय आहे?
तंत्रज्ञान 

तुम्हाला असे कोणी भेटले आहे का जे ओळखीचे असे  वाटते परंतु तुम्हाला त्यांचे नाव किंवा तुमची त्यांच्याशी कशी ओळख आहे ते आठवत नाही? अपना एखाद्या अनोळखी शहरामध्ये फिरताना सतत तुमच्या स्मार्टफोन किंवा जीपीएस वर दिशा पहाव्या लागतात का? कंप्यूटर्स आणि वर्ल्ड वाईड वेब एक बटण दाबताच अजोड माहिती देऊ करते, परंतु डेस्कटॉप्स आणि की-बोर्ड्सपुरते इनपुट्स मर्यादित आहेत.

मोबाईल कॅमेरे, जीपीएस आणि स्क्रीन्स आता वास्तव-वेळातील, स्थान-विशिष्ट माहिती युजरला देऊ शकतात. भविष्यात  वेअरेबल ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी डिस्प्लेंसह, माहिती त्वरीत आणि अगदी तुमच्या डोळ्यांसमोर दिसेल. तुमच्या कंप्यूटर आणि इंटरनेटवरील डेटा दुसरे डिव्हाईस अ‍ॅक्सेस करावे न लागता वरीत अ‍ॅक्सेस करता येईल व पाहता येईल. 

तुमच्या समोर तुम्ही पाहात असलेली रिअ‍ॅलिटी सुधारली किंवा ऑग्युमेंट झालेली आहे ज्यामध्ये प्रोजेक्ट केलेल्या इमेजेससह अतिरिक्त व्हिज्युअल माहिती आहे. तंत्रज्ञान वास्तव जगाबरोबरील आपला संवाद सुधारत असते आणि आपण भविष्याचा वेध घेत असताना आपल्या जीवनामध्ये सुधारणा करत राहील.

एक इमेज पाहून विविध समान इमेज कसे ओळखता येतात?


व्हिज्युअल इमेजबद्दल माहिती काढणे आता नवीन नाही, आपल्या डेटाबेसमधील समान इमेजेस पाहून एखादी इमेज ओळखण्याची क्षमता अनेक शोध इंजिनांमध्ये आधीच आहे. याशिवाय, अनेक प्रकारची सॉफ्टवेअर चेहऱ्याच्या रचनेतील प्रमुख बिंदू पाहून व्यक्तीला ओळखू शकतात. 

ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी डिस्प्ले घालता येणारा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्ससह या तंत्रज्ञानाला एक पाऊल पुढे नेतील. तुम्ही एखादा लँडमार्क, टेक्स्टबुक किंवा व्यक्तीकडे पाहिले की त्या डिस्प्लेसह कनेक्ट असलेला कंप्यूटर तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवून ती तुमच्या दृष्टीपथात ठेवू शकेल. त्यामुळे एखादे वेळी कॉफी शॉपमध्ये तुम्हाला अभिवादन करणाऱ्या व्यक्तीचे नाव तुम्ही विसरला असाल तर काळजी करू नका.

तिचे नाव आणि संक्षिप्त चरित्र तिच्या सोशल नेटवर्किंग खात्यावरून मिळवले जाईल आणि तुमच्यासमोर प्रदर्शित केले जाईल म्हणजे त्यांच्या अभिवादनाला तुम्हाला योग्यप्रकारे प्रतिसाद देता येईल. लोकांची व वस्तुंची ओळख हा ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीयचा कमेव वापर नाही. जसजसे तंत्रज्ञानाचे आकारमान संकुचित होत जाईल तसे हे डिव्हाईस तुमच्या स्मार्टफोन सारखी सर्व कामे करू शकेल.

या तंत्रज्ञानचा वापर तुम्ही आजुन कश्यासाठी करू शकता?

तुम्ही आकाशाकडे पाहून. आजच्या हवामानाबाबत माहिती घेऊ शकाल. मजकूर संदेश आणि इनकमिंग कॉल नोटिफिकेशन्स तुमच्या समोर दिसतील, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला त्याने नवीन टी-शर्ट कुठून आणला हे विचाराल तेव्हा विविध ऑनलाईन स्टोअर्सच्या किंमती तुमच्यासमोर दिसतील. आणि, अर्थातच अनोळखी शहरातील रस्त्यांवर तुम्ही फिरत असताना जीपीएस तुमच्यासमोर बाण दाखवून तुमचे मार्गदर्शन करेल. जरी हे तंत्रज्ञान पुढील काही वर्षांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता असली तरी, त्यामध्ये काही आव्हाने आहेत. 

या तंत्रज्ञानचा वापर करताना येणार्‍या समस्या 

सर्वप्रथम, डिव्हाईसला पॉवर कशी द्यायची ही समस्या आहे. काही डिव्हाईसेस, जसे की चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्ये दिवसभर पुरेल इतकी पॉवर साठविणारी बॅटरी समाविष्ट करता येण्याइतके ते मोठे असू शकतात. दुसरी समस्या म्हणजे मानवी दृष्टीची मर्यादा. सहसा आपल्या डोळ्यांच्या खूप जवळ ठेवलेल्या गोष्टी पाहण्यात आपल्याला अडचण येते. संशोधकांनी ही समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय काढले आहेत, परंतु जवळ दाखवली जात असलेली माहिती आणि वास्तव जगातील घटक, जे दूर असू शकतात त्यांच्यामध्ये फोकस बदलत राहणे डोळ्यांना आरामदायक करणे आवश्यक आहे.  शेवटी, आरामदायक वाटण्याचीही समस्या आहे. हा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स दिवसभर घालायला आरामदायक वाटेल का? ज्यांना ऑग्युमेंटेड रिअॅलिटी माहीत नाही त्यांना तुमच्याकडे बघायला विचित्र वाटेल का

या तंत्रज्ञानाच कुठे वापर होतो?

अनेक कंपन्या आणि विद्यापिठे विविध प्रकारच्या ऑग्युमेंटेड रिअॅलिटी डिस्प्लेंवर काम करत आहेत. सैनिक आणि पायलट्सना मदत करण्यासाठी काहींना लष्करी निधी मिळालेला आहे. सर्वसाधारण जनतेसाठी प्रकाशनाच्या जवळ असलेले एक गुगलचे आहे. प्रोजेक्ट ग्लास विभागातील प्रोटोटाईप चण्याची विविध गुगल कर्मचारी आधीच चाचणी घेत आहेत. 

विंडोज 10 रिलीज झाल्याबरोबर, मायक्रोसॉफ्टने होलोलेन्स हा एम्बेडेड विंडोज सॉफ्टवेअरसह ऑग्युमेंटेड रिअॅलिटी हेडसेट सादर केला आहे. ज्यामुळे युजरला विशेष चष्याद्वारे डिजिटल आणि वास्तव जगामध्ये संवाद साधता येतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या