Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती, कागद पत्र

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती, कागद पत्र

कोरोनावरील उपचार घेताना अनेकांना रुग्णालयात उपचाराचा खर्च भागवणं कठीण जाते. अशावेळी आपल्याला महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी माहिती असणे खूप गरजेचे आहे. या योजने मुळे तुम्हाला नक्की मदत होईल. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऐनवेळी कागदपत्रांची तडजोड करण्यासाठी धावपळ करावी लागते. ही धावपळ होऊ नये यासाठी हि माहिती व्यवस्तीत समजून घ्या.

चला तरो या योजनेबद्दल थोडी माहिती घेऊ. या योजनेअंतर्गत राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी  नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळतो. या अंतर्गत राज्यातील कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपया पर्यंतचे विमा संरक्षण मिळते. महत्वाचे म्हणजे या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कोण पात्र आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी?

राज्यातील पिवळी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील - शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभ घेऊ शकतात.


या योजनेचा लाभ कोणत्या रुग्णालयात घेता येईल?

यासाठी jeevandayee.gov.in या योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर , Network Hospitals या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्ही DistrictWise Hospital किंवा कोणत्या प्रकराचा उपचार घ्यायचा आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील या योजनेशी संलग्नित रुग्णालयाची माहिती घेउ शकता.

रुग्णची नोंदणी कुठं करावी?

या योजनेअंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात - तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात. दरम्यान रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी आणि त्याचे ओळखपत्रे  सुद्धा पाहली जातात.

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, शिधापत्रिका तसेच छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, याव्यतिरिक्त आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या