Ticker

6/recent/ticker-posts

वेबसाईट किंवा ब्लॉग ला Google Search Console Tool मधे कसे submit करावे? मराठी मधे (भाग 3)

वेबसाईट किंवा ब्लॉग ला Google Search Console Tool मधे कसे submit करावे? मराठी मधे (भाग 3)

या आधीच्या पोस्ट मधे तुम्ही वाचले असेल की ब्लॉगर मधे sign Up कसे करावे आणि वेबसाईटसाठी organic आणि सोशल ट्राफिक कसे आणावे ही माहिती आपण या आधी घेतली. आता आपण हे वाचणार आहोत ही की,  ब्लॉग/वेबसाईट ला गूगल Webmaster Tool मधे कसे submit करावे. Organic ट्राफिकसाठी आपल्या आपली साइट गूगल मधे इंडेक्स करणे खूप गरजेचे आहे. गूगल सर्च इंजिनला हे समजेल पाहिजे की आपल्या वेबसाईट वरची माहिती ही लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध आहे. वेबसाईट ला इंडेक्स करण्यासाठी गूगल webmaster tool वापर केला जातो. पहिले Google Search Console Tool ला Google Webmaster Tool म्हणून ओळखले जात होते.

Google Search Console Tool च्या मदतीने आपण लिहिलेले माहिती ही गूगल सर्च मधे शो करू शकतो. तुम्हाला माहिती असेल गूगल आणि बिंग.कॉम या सर्च इंजिन मधे एक दिवसात लाखो, करोडो डाटा साठत असतो त्यामुळे सुरुवातीला गूगलला आपली वेबसाईट crwal करण्यामधे अडचण येत असतात. त्यासाठी Webmaster Tool मधे साइट submit करणे गरजेचे आहे. 

चला तर वाचूया तुम्ही कशा प्रकारे ब्लोग आणि वेबसाईट गूगल Webmaster Tool सोबत जोडू शकता.

सर्व प्रथम तुम्ही एक browser open करा आणि त्या नंतर Google Search Console Tool असे सर्च केल्या दुसर्‍या क्रमांकावर तुम्हाला official वेबसाईट दिसेल मग त्या वर क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्या नंतर Start Now वर क्लिक करा. 

तुम्हाला Welcome To Google Search Console टॅब दिसेल. त्या मधे वेबसाईट submit कारणासाठी दोन ऑप्शन दिसतील. एक म्हणजे डोमेन आणि दुसरा म्हणजे URL Prefix. या दोघांन पैकी तुम्हाला URL prefix मधे तुमच्या वेबसाईट/ब्लॉग चा URL टाकायचा आहे. त्या नंतर Continue वर क्लिक करा. आता तुम्हाला वेबसाईट verfiy कारणासाठी सांगेल. या मधे तुम्हाला HTML Tags वर क्लिक करून दिलेले कोड हा तुमच्या वेबसाईट च्या head Tag च्या खाली पेस्ट करायचा आहे. 

वेबसाईट कशी Verify करावी?

HTML Tag मधे दिलेले कोड तुम्हाला head Tag च्या खाली टाकायचा आहे. त्या साठी सर्व प्रथम ब्लॉगर Dashboard मधे जा आणि सब मेनू मधील थीम या ऑप्शन वर क्लिक करा. त्या नंतर custimze च्या बाजूच्या arrow वर क्लिक करा मग तुम्हाला एडिट HTML हा ऑप्शन देसले मग एडिटर विंडो ओपन होईल त्या मधे सुरुवातीला किंवा थोडा खाली Head Tag दिसली किंवा तुम्ही कंट्रोल+f दाबून <head> हे सर्च केला की head टॅग दिसेल त्याच्या खाली तुम्हाला HTML Tag कोड पेस्ट करायचा आहे. हे झाल्या नंतर save वर करा. आता सर्च Console मधे जाऊन, खाली दिलेल्या Verfiy बटन वर क्लिक करा थोडा वेळा नंतर तुमची वेबसाईट Verfiy होईल. या पुढची महत्वाची पायरी म्हणजे Sitemap Submit करणे. जर तुम्हाला sitemap कसा Genareate करावा माहिती नसेल तर तुम्ही ही माहिती वाचू शकता.

Sitemap कसा Submit करवा?

वेबसाईट/ब्लॉग Verfiy झाल्या नंतर तुम्हाला sitemap करायचा आहे. त्या साठी Search Console वरील डावी बाजूला तीन आडव्या लाइन वर क्लिक करा. Property म्हणजे तुमच्या वेबसाईट चा नाव देसले त्यावर क्लिक करा. तुम्हाला इंडेक्स हे ऑप्शन दिसेल आणि त्या मधे sitemap ऑप्शन असेल. त्यावर क्लिक नंतर sitemap submit करा असे show केले जाईल. जर ब्लॉगर ब्लॉगर वापरत असाल तर खालील कोड पेस्ट करा. Sitemap साठी 👇 कोड पेस्ट करा.

atom.xml?redirect=false&start-index=1&max-results=500

OR

Sitemap.xml


या दोन्ही कोड चा वापर करू शकता sitemap submit करण्यासाठी. या नंतर Google Search Console ला दोन ते तीन दिवस लागतात संपूर्ण वेबसाईट इंडेक्स करण्यासाठी. जर तुम्हाला manually submit करायची असेल वरती दिलेल्या सर्च या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही वेबसाईट submit करू शकता. जरा तुम्हाला वाचण्यात काही अडचण आली असेल तर तुम्ही Video पण पाहू शकता. 

Video पहा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या