Ticker

6/recent/ticker-posts

नैसर्गिक आहार म्हणजे काय? निरोगी जीवन जगण्यासाठी नैसर्गिक आहाराचे महत्त्व

निरोगी आणि रोगमुक्त जीवन जगण्यासाठी नैसर्गिक आहार हा मानवी शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज-काल माणूस या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे त्यांना अनेक वैद्यकीय गोष्टीना तोंड द्यावे लागते. जर तुम्हाला तुमची जीवन रोगमुक्त करायचे असेल तर खालील माहिती नक्की वाचा.

नैसर्गिक आहार म्हणजे काय? निरोगी जीवन जगण्यासाठी नैसर्गिक आहाराचे महत्त्व

नैसर्गिक आहार म्हणजे काय?

कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर न करता, सपूर्णतः नैसर्गिक व सेंद्रिय तत्त्वांचा वापर करून निसर्गाच्या कुशीमध्ये तयार केलेल्या (झालेला) विषमुक्त व पोषणतत्त्वांनी भरपूर व मनुष्याला खाण्यायोग्य असा आहार म्हणजेच नैसर्गिक आहार होय.

निसर्ग निर्मित नैसर्गिक आहाराचे सेवन म्हणजेच आरोग्य संपन्न जीवन होय. प्रसिद्ध वैद्यकीय चिकित्सक रॉबर्ट मॅकॅरिसनच्या मते पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व औषधांमध्ये योग्य औषध म्हणजे, योग्य नैसर्गिक आहार हेच श्रेष्ठ औषध आहे. परंतु स्पर्धेच्या आधुनिक युगात जास्तीत-जास्त उत्पादन घेणाच्या नादात धान्य, पालेभाज्या व फळांवर करण्यात येणाऱ्या जास्तीच्या किटक नाशकामुळे व जास्तीच्या रासायनिक खतामुळे, तसेच खाद्य पदार्थात कृत्रिम रंग, स्वाद व गंध निर्माण करण्याच्या पद्धती, तसेच खाद्यपदार्थांवर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांमुळे खाद्यपदार्थ विषमय होऊन त्याची गुणवत्ता व प्रत कमालीची कमी झाली आहे, नष्ट झाली आहे.

या विषयुक्त व पोषणरहित आहारामुळे मनुष्याची प्रतिकार शक्ती कमालीची बिघडली आहे, खालावली आहे. त्यामुळे आपण त्वरीत कोणत्याही रोगाला बळी पडत आहे, रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती नष्ट झालेली आहे आणि आपणाला झालेला रोग बरा होण्यासाठी आपण वारेमाप औषधांचा वापर करत आहोत. औषधात असणाऱ्या विषामुळे, आधीच रोगामुळे कमकुवत झालेले शरीर अधिक कमकुवत करत आहोत. निसर्गोपचार पद्धतीत सांगितलेल्या रसाहार पद्धतीचा स्विकार करून, शरीर सुदृढ बनविणे महत्वाचे झाले आहे. 

योग्य व पौष्टिक समतोल आहार म्हणजे निरोगी जीवन चढण्याची एक पायरी आहे. हे आता हळूहळू लोकांना कल लागले आहे. ज्या असाध्य रोगावर आधुनिक औषधांची व उपचार पद्धतीचीही मात्रा चालत नाही, त्या रोगांवर पालेभाज्या व फळांचे 'ज्युस' अत्यंत परिणामकारक ठरलेले आहेत. इतकेच नव्हे तर जगातील अनेक वैद्यकीय चिकित्सक रुग्णावर उपचार करतांना पालेभाज्या व फळांच्या रसावर भर देऊ लागले आहेत..

ज्युसचिकित्सेला आता अधिक महत्व प्राप्त होऊ लागले आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक डॉक्टर्स व रोगी (रुग्ण) औषधांव्यतिरिक्त इतर इलाजाकडे वळू लागले आहेत आणि त्यासाठी ते योग्य नैसर्गिक आहार पालेभाज्या व फळांच्या रसांचा उपयोग करू लागले आहेत. अनेक देशांमध्ये पालेभाज्या व फळांच्या रसाच्या मदतीने दुर्धर व कॅन्सर सारख्या रोगावर ‘रसाहार' पद्धतीचा अवलंब करून हजारो रोगी बरे केले आहेत. भारतातही अनेक वैद्यकीय चिकित्सक सुद्धा 'निसर्ग उपचार' व 'रसाहार' चा वापर करून रुग्णावर उपचार करत आहेत. 

पुण्याजवळील 'उरळी कांचन' या नैसर्गिक चिकित्सा केंद्रात हजारो रुग्णांवर ‘रसाहार' च्या माध्यमातून यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. म्हणूनच म्हटले आहे 'रसाहार' हा अमृतसमान आहे. शिजवलेले अन्न पदार्थ पूर्णपणे पचायला ६ ते ८ तास लागतात तर न शिजवलेले अन्नपदार्थ पचायला ३ ते ४ तास लागतात. आणि पालेभाज्या व फळांचा ज्युस पचायला किंवा त्याचे संपूर्ण शोषण व्हायला फक्त एक ते दीड तास लागतो. म्हणजेच रसाचे शोषण त्वरित होते.

तुम्हाला माहितीच असेल जागोजागी करोन संक्रमण खूप वाढले आहे. पालेभाज्या विकत घेताना त्यांना नीट-धुवून वापर करा. जेणेकरून त्यामधील जंतूचा नाश होईल आणि पौष्टिक अन्न शारीराला प्राप्त होईल. त्यामुळे मित्रानो तुमच जीवन तुमच्या हातात आहे. तुम्ही या वरती दिलेल्या गोष्टीचे पालन करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या