Ticker

6/recent/ticker-posts

शरीरावर होणारे त्वचारोग, बाहेरोग यांची लक्षणे आणि उपाय

सोरायसिस, एक्झिमा ङमेटायटिस इत्यादी माहिती मराठी मधे 

शरीरावर होणारे त्वचारोग, बाहेरोग यांची लक्षणे आणि उपाय

त्वचारोगाचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये चिवट त्वचारोग ज्यावर आयुर्वेदात उत्तम उपचार होतात. सोरायसिस, एक्झिमा, पांढरे डाग, पिंपल्स, चेहऱ्यावरचे वांग, सौंदर्य समस्या यावर आयुर्वेदातील उपचार प्रभावी ठरतात. बात, पित्त, कफ यापैकी त्वचेला प्राकृत ठेवण्याचे काम पित्त आणि सप्तधातूंपैकी रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शक्र यापैकी रक्त धातूचे आहे. साधे पिंपल्स असो की, सोरायसिससारखा चिवट आजार याचे मूळ कारण पित्त व रक्तदोष हेच असते. मुख्यतः बद्धकोष्टता असल्यास त्रिदोषांचे संतुलन बिघडते. 

त्यामुळे रक्तातील दोष वाढतो. यासाठी आहार प्राकृत असला पाहिजे. जंक फूड, लोणची, पापड, खारट, आंबट पदार्थ यांचे सेवन अतिप्रमाणात करू नये. सॅलड, पालेभाज्या, प्रोटीनयुक्त आहार, ज्या ऋतूमध्ये जी फळे मिळतात त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता होत नाही. त्यानुसार आहाराकडे लक्ष द्यायल हवे. जुनाट, चिवट त्वचारोगामध्ये काही प्रमाणात आनुवंशिकता दिसून येते. 

एक्झिमा ङमेटायटिस काय असते?

या आजारांमध्ये आनुवंशिकता दिसून येते. सर्वात महत्त्वाचे सौंदर्य दुर्लक्षिल्या गेलेले कारण दुःख, राग, चिंता, आनंद या आपल्या भावना व्यक्तन करता आतल्या आत दाबून ठेवल्यास त्याचा उद्रेक शारीरिक व्याधींमध्ये रुपांतरित होतो. अस्थमा, जुनाट त्वचारोग, निद्राविकार यासारखे शिवाय आयुर्वेदिक उपचार पद्धतीने त्वचारोगाचा पूर्ण नायनाट होऊ शकतो. त्रिदोष व सप्तधातू यावर अवलंबून असते. 

बिघडलेले दोष सामान्य अवस्थेत आणणे व त्यानुसार त्या रोगावर उपचार केला जातो. यात रोगाचे मूळ, रुग्णाचा आहार, त्याची पचनशक्ती, पथ्य, निद्रा, दिनचर्या या सर्वांचा विचार करून त्यात दोष असेल तर या सर्वात बदल करून चिकित्सा केल्या जात असल्यामुळे यामध्ये त्वचारोग बाढण्याचे प्रमाण प्रथम कमी होऊन नंतर हळूहळू त्वचारोग पूर्ण बरा होऊ शकतो, पण रुग्णाचे सहकार्यही तेवढेच आवश्यक आहे. पथ्य पाळणे, आहाराचे पालन करणे. 

औषधाची मात्रा सांगितल्याप्रमाणे वेळेवर घेणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. लवकर रोगमुक्त होतो. शिवाय नंतरही ज्या आहाराने दोष वाढू शकतात तशा आहारावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पांढरे डागः कितीतरी लोकांकडून ऐकण्यात आले असेल यावर उपचारच नाही, पण होय यावर उपचार आहे. आयुवेर्दातच. या उपचाराने त्वचेवर काळे डाग येऊन त्वचा पूर्ववत व्हायला लागते. यासाठी पथ्य आणि नियमित औषधी घेणे आवश्यक आहे. पांढरे डाग कष्टसाध्य आहे, पण असाध्य नाही. वेळ लागतो पण उपचार होतात. आधुनिक शास्त्र आणि आयुवेर्दातील औषधांची परिणामकारकता लक्षात घेऊन त्यावर उपचार केल्यास पहिल्या महिन्यापासूनच फरक पडायला लागतो. 

सोरायसिस म्हणजे काय?

सोरायसिस: हा चिवट आजार आहे. सतत खाज आणि पडणारा कोंडा यामुळे रुग्ण भयंकर त्रस्त असतो आणि विद्रूप शरीरावर लोकांनी दिलेले सल्ले, सुचवलेले उपचार आणि चिटकून बसलेला हा आजार यामुळे जीव नकोसा होतो, सोरायसिसचे ७ प्रकार आहेत. नखांचा, तळहाताचा व तळपायाचा, पूर्ण शरीरावर लाल गोल चकते येणारा, ड्रॉपसारखा पूर्ण अंगावर येणारा, डोक्यामध्ये येणारा, एक तर खूपच अचानक आणि गंभीर स्वरूपाचा (ईरंथोडर्मिक), त्यासाठी ६ महिने-१वषार्चा कालावधी लागतो. मग हळूहळू त्वचा नॅचरल व्हायला सुरुवात होते.

पीसीओडी म्हणजे काय?

पीसीओडी: पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिण्ड्रोम हा एक गुंतागुंतीचा अंतःस्त्रावी ग्रंथीचा आजार आहे. यामध्ये मुलींना वयात आल्यावर अनियमित मासिक पाळी येणे, शरीरावर किंवा चेहऱ्यावर पुरुषासारखे केस येणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, जडपणा जाणवणे, पोटावर जास्त चरबी वाढणे यासारखी लक्षणे असतात. यामुळे वंध्यत्व, इन्सुलीन रजिस्टंस तयार होणे, यासारखे भयानक परिणाम भविष्यात होऊ शकतात. यासाठी आयुर्वेद पुढच्या दृष्टीने फायदेशीर व उत्तम परिणामकारक आहेत. केस गळणे, सारखे पिंपल्स येणे, त्वचा कोरडी पडणे किंवा एकदम तेलकट होणे अशा काही न काही तक्रारी सुरुच असतात. त्यामुळे मुलींचे सौंदर्यच नष्ट होते.

थॉयरॉईड म्हणजे काय?

थॉयरॉईडचे 2 प्रकार आहेत. हायपर है थॉयरॉइडिझम आणि हायपो थॉयरॉईडिझम. यामध्ये वजन वाढणे, त्वचा कोरडी होणे, केस गळणे, जास्त घाम येणे, छातीत धडधड होणे, हायपर टेंशन, काळजी घेतल्यास इतर आजारही संभवतात. ह्यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात संभवते. त्यासाठी मी काही औषधींसोबतच आयुवेर्दातील उपचार लक्षणीय परिणाम घडवून आणतो. 

ॲटो-ईम्युन डिसीजेस म्हणजे काय?

ॲटो-ईम्युन डिसीजेस: यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक्षमता शरीरावर हल्ला करणाऱ्या व्हायरस, बॅक्टेरियातील सेल्सला परतवून लावत असतात, पण कधी-कधी शरीरात असे काही बदल होतात की, त्या सेल्स चुकीने आपल्या शरीरातील हेल्दी सेल्सवरच हल्ला करायला लागतात आणि मग त्याला म्हणतात ॲटो-ईम्युनचा, डिसीज. याचे खूप प्रकार आहेत. रुमॅटॉईडल अर्थरायटिस, थॉयरॉईड, सोरायटिक नवर अर्थरायटिस, सिस्टीमिक ल्युपस इरथमॅटस, पच सोरायसिस, व्हिटिलिगो यासारख्या गंभीर. आजाराला आटोक्यात आणणे आयुवेर्दानुसार शक्य होते. त्यासाठी नियमितता आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या