Ticker

6/recent/ticker-posts

दुहेरी मास्क घातल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? हे करा, हे करु नका

दुहेरी मास्क घालण्याचे फायदे काय आहे?

दुहेरी मास्क घातल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? हे करा, हे करु नका

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मास्क हे प्रभावी अस्त्र आहे.. त्यामुळे विषाणूंचा शरीरात होणारा प्रवेश रोखला जातो. सर्जिकल मास्क, कापडाचा मास्क, एन-९५, एन-९९, डल्यू-९५ इत्यादी अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. त्यात एन-९५ मास्क सर्वात सुरक्षित! लोक वेगवेगळ्या प्रकारचे मास्क वापरत असल्याचे दिसते. कापडाच्या व सर्जिकल मास्कचा वापर करणाऱ्यांना तज्ज्ञांनी आता स्वत:चा बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर दोन मास्क वापरण्याच्या सल्ला दिला आहे. 

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या संशोधन अभ्यासात 'दुहेरी मास्क' वापरण्याने कोरोना विषाणूपासून अधिक संरक्षण होते, असे दिसून आले आहे. कापडी व सर्जिकल अशा दुहेरी मास्कच्या वापराने मास्कच्या बाजूच्या भागातून होणारी हवेची गळती थांबते आणि असे दुहेरी मास्क चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे फिट बसतात. अतिशय कमी सुरक्षित कापडी मास्कच्या वापराने केवळ ५१.४%, गाठ न मारता, वापरलेल्या वैद्यकीय वापरासाठी सुरक्षित असलेल्या सर्जिकल मास्कने ५६% आणि गाठ मारून वापरलेल्या सर्जिकल मास्कच्या वापराने ७७% संरक्षण मिळते. मात्र, दुमडलेल्या व गाठ मारलेल्या सर्जिकल मास्क व कापड़ी मास्क अशा दुहेरी = वापराने ८५.४% संरक्षण मिळते. दुहेरी मास्क लावताना आतून सर्जिकल मास्क तर बाहेरून कापडी मास्क घालायचा असतो. सर्जिकल मास्कच्या अगदी जवळ दोन्ही दोन्यांना गाठी मारा, त्यामुळे तो मास्क दुमडला जाईल.असा दुमडलेला मास्क नाकावर व तोंडावर लावा. हाताने तो नीट करा आणि त्यानंतरचकापडी मास्क बाहेरून घाला. स्ट्रेचमार्क्स कसे कमी करावे?

दुहेरी मास्क घातल्यानंतर हे करा

दुहेरी मास्क घातल्यानंतर प्रथम तुम्हाला नीट श्वास घेता येतो, याची खात्री करा व काही त्रास होत असल्यास थोडा थोडा वेळ एकेरी तर नंतर काही वेळा नंतर तुम्ही दुहेरी मस्क घाला. जेणे करून तुम्हाला श्वास घेण्यामध्ये अडचण नाही येणार. त्याचबरोबर तुम्हाला बोलता येते का हेही पाहा.  बाहेर जाण्यापूर्वी थोडसं चालून पाहा. घरा बाहेर पडण्याआधी तुम्ही दुहेरी मास्क घालण्याचा सराव करू शकता. जेणे करून तुम्हाला समजेल की आपल्याला किती वेळ दुहेरी मास्क ठेवता येईल.

दुहेरी मास्क घालताना या गोष्टी करू नका

नुसतेचदोन सर्जिकल मास्क किंवा नुसतेच दोन कापडी मास्क नकोत. एन-९५ मास्कसोबत अन्य कुठलाही मास्क नको. मास्कवर कुठलेही डिसइन्फेक्टंट मारू नका. अस्वच्छ, शिंकण्याने ओला झालेला मास्क वापरू नका. मास्क घातल्यावर श्वास आत ओढा, श्वास घेतल्यानंतर मास्क चेहऱ्याला चिकटत असेल, तर तो नीट काम करत आहे, असे समजावे. नंतर आरशासमोर उभे रहा.  श्वास जोरात बाहेर सोडल्यानंतर जर डोळ्याच्या पापण्या बंद झाल्या, तर मास्कमधून हवेची गळती होत आहे, त्या हवेमुळे डोळ्याच्या पापण्या बंद होतात. म्हणजेच मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या